EasyShare अंतिम-वापरकर्ता परवाना आणि सेवा करार

  हा EasyShare अंतिम-वापरकर्ता आणि सेवा करार (यानंतर याला "करार" असे म्हटले जाईल) हा तुम्ही आणि iQOO दरम्यान EasyShare सेवा (यानंतर याला "ॲप" म्हटले जाईल) आणि संबंधित तंत्रज्ञान आणि फंक्शन (यानंतर सामुहिकपणे "सेवा" म्हटले जाईल) साठी एक करार आहे. कृपया या कराराच्या सर्व अटी आणि शर्ती काळजीपूर्वक वाचा आणि पूर्णपणे समजून घ्या, विशेषतः iQOO च्या दायित्वातील सवलती आणि मर्यादेशी संबंधित, वापरकर्ता हक्कांच्या मर्यादा, विवादाचे निराकरण आणि लागू कायदे, तसेच ठळक स्वरूपात चिन्हांकित केलेले कंटेंट. सेवेचा पूर्ण किंवा अंशत: तुम्ही वापर केल्याने तुम्ही कराराच्या सर्व अटी स्वीकारल्या आहेत असे समजले जाईल आणि तुम्ही iQOO सोबत बंधनकारक करारात सामील झाले आहात असे समजले जाईल. जर तुमची या करारासाठी संमती नसेल तर तुम्ही ही सेवा वापरू शकणार नाही.

  येथे नमूद "आम्ही" किंवा "iQOO" चा अर्थ vivo Mobile Communication Co., Ltd., आहे जे No.१ vivo Rd., Chang’an, Dongguan, Guangdong Province, China, येथे स्थित आहे, ज्यांचा युनिफॉर्म सोशल क्रेडिट कोड ९१४४१९००५५७२६२०८३U आहे जो Dongguan नगरपालिकेच्या बाजारपेठ पर्यवेक्षण प्रशासनाद्वारे नोंदणीकृत आहे.

१ नागरी आचारसंहितेसाठी योग्यता

  १.१ तुम्ही जबाबदारी घेता आणि हमी देता की सेवेचा वापर करतांना किंवा या कराराला संमती देतांना तुमच्या प्रदेशाच्या कायद्यांनुसार नागरी आचारसंहितेसाठी तुमची पूर्ण योग्यता आहे.

  १.२ जर तुम्ही अल्पवयीन असाल किंवा तुमच्या देशाच्या कायद्यांनुसार नागरी आचारसंहितेसाठी तुमची पूर्ण योग्यता नसेल तर तुमच्या पालक किंवा संरक्षकांच्या संमती किंवा पुष्टीशिवाय तुम्ही सेवेचा वापर करू नये किंवा या कराराला संमती देऊ नये.

  १.३ तुम्ही सेवेचा वापर केल्याने किंवा या कराराला संमती दिल्याने असे समजले जाईल की या भागाच्या पहिल्या परिच्छेदामधील तरतुद तुम्ही पूर्ण करीत आहात किंवा तुम्ही तुमच्या पालक किंवा संरक्षकाकडून संमती घेतली आहे.

२. सेवा

  २.१ ही सेवा तुम्हाला डिव्हाइसेस दरम्यान फाइल्स ट्रान्सफर करण्याची क्षमता प्रदान करते. मुख्य फंक्शन खालीलप्रमाणे आहेत:

    २.१.१ वैयक्तिक माहितीच्या सेटिंग्ज: सेवा वापरताना तुम्ही स्वत:चे टोपणनाव आणि अवतार सेट करू शकता.

    २.१.२ फोन क्लोन: तुम्ही समोरासमोर एकमेकांना अॅप्लिकेशन, संगीत, व्हिडिओ, ऑडिओ, इ. डेटा पाठवण्यास किंवा मिळवण्यास दुसऱ्या मोबाइल डिव्हाइससोबत कनेक्शन स्थापित करण्यास ही सेवा वापरू शकता.

    २.१.३ डेटा बॅकअप: तुम्ही तुमच्या फोन ते तुमच्या संगणकावर अॅप्लिकेशन, संगीत आणि व्हिडिओसारख्या डेटाचे बॅकअप घेण्यास किंवा तुमच्या संगणकावर बॅकअप घेतलेला डेटा तुमच्या फोनवर रिस्टोर करण्यास तुमच्या संगणकासोबत कनेक्शन स्थापित करण्यास सेवा वापरू शकता.

    २.१.४ फाइल ट्रान्सफर: तुम्ही चित्रे, संगीत, व्हिडिओ, ऑडिओ आणि फाइल व्यवस्थापनामध्ये अॅक्सेसयोग्य इतर कुठले कंटेंट (सामुहिकपणे "कंटेंट") समोरासमोर दुसऱ्या पक्षासोबत/त्याकडून पाठवण्यास/मिळवण्यास सेवेद्वारे तुमच्या डिव्हाइस आणि दुसऱ्या मोबाइल डिव्हाइसदरम्यान कनेक्शन स्थापित करू शकता.

  २.२ इतर

    २.२.१ या सेवेद्वारे सपोर्टेड विशिष्ट कार्ये, सिस्टमची आवृत्ती आणि डिव्हाइसच्या मॉडेलनुसार वेगवेगळी असू शकतात, कृपया वास्तविक उपलब्धतेचा संदर्भ घ्या.

    २.२.२ तुम्ही समजता आणि सहमती देता की: तुम्हाला प्रभावी सेवा प्रदान करण्यासाठी, ही सेवा तुमच्या टर्मिनल प्रोसेसर, ब्रॉडबँड आणि इतर संसाधनांचा लाभ घेऊ शकते. ही सेवा वापरताना उद्भवणाऱ्या सततच्या डेटाच्या मूल्यासाठी, तुम्हाला ऑपरेटरकडून संबद्ध फी माहिती करून घेणे आणि तुम्ही स्वतःच संबंधित खर्च सहन करणे आवश्यक आहे.

    २.२.३ वापरकर्ता अनुभव आणि सेवा सामुग्रीमध्ये सुधारणा करण्यासाठी, iQOO हे वेळोवेळी नवीन सेवा विकसित करण्यासाठी प्रयत्न करेल आणि अपडेट सेवा प्रदान करेल (ही अपडेट कदाचित बदल करणे, सुधारणा, फंक्शनला सामर्थ्य देणे, आवृत्ती अपग्रेड, सामुग्रीची अॅडजस्टमेंट आणि इ. यासारखे एक किंवा आणखी स्वरूप स्वीकारू शकतात). सुरक्षिततेची सुसंगतता आणि सेवा कार्यरत राहण्यासाठी, iQOO ला तुम्हाला कोणतीही विशेष सूचना न देता सेवा अपडेट करण्याचा किंवा ती अॅडजस्ट करण्याचा किंवा सेवेत बदल करण्याचा किंवा सर्व फंक्शनवर किंवा त्याच्या काही भागावर मर्यादा घालण्याचा हक्क आहे.

३ परवाना आणि मालकी हक्क

  ३.१ iQOO याद्वारे तुम्हाला सेवेचा वापर करण्याचा अ-विशिष्ट, अ-हस्तांतरणीय, अ-उपपरवानायोग्य, रद्द करता येण्यासारखा आणि मर्यादित परवाना देत आहे.

  ३.२ याद्वारे iQOO ने तुम्हाला दिलेल्या परवान्यांचा अर्थ iQOO ने तुम्हाला कोणतीही सामुग्री, उत्पादन किंवा सेवेची पूर्णपणे किंवा अंशत: विक्री आणि/किंवा हस्तांतरण करण्याची परवानगी दिली आहे असा समजला जाऊ नये.

  ३.३ iQOO तुम्हाला स्पष्टपणे किंवा पूर्णपणे कोणतेही अधिकार किंवा कॉपीराइटचे स्वारस्य, ट्रेडमार्क, पेटंट किंवा इतर कुठलेही बौद्धिक संपत्ती किंवा मालकी हक्क देत नाही, या कराराच्या कलम ३.१ मध्ये तुम्हाला दिलेल्या सेवा आणि अॅपचा मर्यादित परवाना राखून ठेवा.

  ३.४ सेवेशी संबंधित कंटेंटचा कसलाही व्यावसायिक वापर, सुधारणा, विभाजन, विघटन किंवा रिव्हर्स इंजिनिअर मुळीच करू नये.

  ३.५ तुम्ही मान्य करता आणि त्यासाठी तुमची संमती आहे की सेवेशी संबंधित सर्व सॉफ्टवेअर आणि कंटेंट ज्यामध्ये संरचना, सोर्स कोड्स आणि सॉफ्टवेअरशी संबंधित दस्तऐवजांच्या समावेशासह मात्र तेवढ्यापुरतेच मर्यादित न रहाता सर्वच गोष्टी iQOO, iQOO चे सहयोगी किंवा त्यांचे पुरवठादारांची संपत्ती आहे, ज्यात मौल्यवान व्यापार गुपिते आणि/किंवा बौद्धिक संपत्तीचा समावेश आहे आणि या गोष्टींना iQOO, iQOO चे सहयोगी किंवा त्यांचे पुरवठादारांची गोपनीय माहिती म्हणून समजावे.

  ३.६ तुमची संमती आहे की तुम्ही या सेवेचा वापर केवळ अशा प्रकारे कराल जो सर्व लागू कायद्यांनुसार असेल, ज्यात मर्यादेशिवाय संबंधित कॉपीराइट आणि इतर बौद्धिक मालमत्ता हक्क नियमांनुसार आणि/किंवा निर्यात नियंत्रण नियमांचा समावेश आहे.

४ वापरकर्त्यांची वागणूक

  ४.१ तुम्ही याद्वारे करार करीत आहात की, तुम्ही सेवेचा वापर करीत असतांना लागू असलेल्या सर्व कायदे आणि नियमांचे पालन कराल आणि कोणतेही कायदेशीर किंवा उल्लंघन करणारी कृती करण्यास सेवेचा वापर करणार नाही, यात मर्यादेशिवाय खालील गोष्टींचा समावेश होतो:

    ४.१.१ होस्ट करणे, प्रदर्शित करणे, अपलोड करणे, सुधारित करणे, प्रकाशित करणे, ट्रान्समिट करणे, स्टोअर करणे, अपडेट करणे किंवा शेअर करणे:

        ४.१.१.१ कोणतीही बेकायदेशीर, बदनामीकारक, अपमानास्पद, भेदभाव करणारे, चिथावणी देणारे, दहशतवादी, आक्रमक, हिंसक, द्वेषपूर्ण, बीभत्स, पोर्नोग्राफिक, वांशिक किंवा वांशिकदृष्ट्या तिरस्कार करणारी, लिंगानुसार अपमानास्पद किंवा छळणूक करणारी, राष्ट्रीय सुरक्षा, एकात्मता किंवा सार्वभौमत्व किंवा सार्वजनिक सुव्यवस्थेसाठी धोकादायक किंवा कोणत्याही अर्थाने अन्य आक्षेपार्ह सामुग्री;

        ४.१.१.२ कोणतेही कंटेंट जे पेडोफिलिक किंवा लहान मुलांसाठी हानिकारक आहे;

        ४.१.१.३ सॉफ्टवेअर व्हायरस किंवा कोणताही अन्य कॉम्प्यूटर कोड असलेले कंटेंट, फाइल किंवा व्यत्यय आणण्यासाठी डिझाइन केलेले प्रोग्राम, कोणत्याही कॉम्प्यूटर संसाधनाची कार्यक्षमता नष्ट करते किंवा त्यावर मर्यादा आणते;

    ४.१.२ फसवणूक, अवैध सावकारी, बेकायदेशीर व्यवहार, जुगार आणि वगैरे किंवा त्याच्याशी विसंगत किंवा विद्यमान कायद्यांच्या विरुद्ध;

    ४.१.३ नाव (जसे की दुसऱ्या व्यक्तीची तोतयागिरी करणे), प्रतिष्ठा, वैयक्तिक माहिती, गोपनीयता आणि व्यापार रहस्य, कॉपीराइट, पेटंट अधिकार, ट्रेडमार्क आणि इतरांचे इतर मालकी हक्कांचे उल्लंघन करणे;

    ४.१.४ हेतूपूर्वक चुकीचा संपर्क साधणे किंवा कायद्याचे उल्लंघन करण्याच्या हेतूने माहिती देऊन दिशाभूल करणे आणि/किंवा इतरांचे अधिकार आणि स्वारस्ये यांचे उल्लंघन करणे; आणि

    ४.१.५ इतर कोणतीही कृती जी लागू कायदे आणि नियमांचे उल्लंघन करते, इतरांच्या अधिकारांचे उल्लंघन करते आणि/किंवा अल्पवयीन मुलांना कसल्याही प्रकारे हानी पोहोचवते.

  ४.२ तुम्ही मागील परिच्छेदाचे उल्लंघन केले असल्यास, iQOO कडे सेवा निरस्त करण्याचा, उल्लंघन करणारी/बेकायदेशीर सामुग्री काढण्याचा आणि आवश्यक ती कायदेशीर पाऊले उचलण्याचा एकतर्फी अधिकार असेल.

५ वैयक्तिक माहितीची सुरक्षा

  आम्ही तुमच्या गोपनीयतेचे आणि वैयक्तिक माहितीचे महत्व जाणतो त्यामुळे तुमच्या माहितीचे आमचे संकलन आणि प्रसंस्करण आमच्या "गोपनीयता धोरण" नुसार केले जाते. तुम्ही सेवा वापरण्यापूर्वी, कृपया EasyShare गोपनीयता अटी तपशीलवार वाचा.

६ अस्वीकरण

  ६.१ ही सेवा केवळ तुमच्या वैयक्तिक वापरासाठी आहे आणि तुम्ही कोणत्याही तृतीय पक्षाला प्रदान करू नये. तुम्ही समजता आणि तुमची संमती आहे की iQOO द्वारे प्रदान केलेली सेवा, कार्यप्रदर्शन किंवा फंक्शनच्या तुमच्या वापराच्या (म्हणजेच बेकायदेशीर किंवा या कराराच्या उल्लंघनापोटी) परिणामांसाठी तुम्हीच एकटे जबाबदार आहात. सेवेचा तुम्ही वापर करण्यासंबंधी सर्व जोखमी घेण्यास तुमची संमती आहे.

  ६.२ याउलट काहीही अंतर्भूत असले तरीही सेवा, आणि सेवेशी संबंधित सर्व माहिती, उत्पादने, सॉफ्टवेअर, प्रोग्राम्स आणि कंटेंट ज्यामध्ये ॲपचा समावेश आहे पण त्यापर्यंत मर्यादित नाही, त्यांना "जसेच्या-तसे" आधारे सादर केले जाते, त्यासाठी कसल्याही प्रकारची हमी आणि शाश्वती दिली जात नाही. iQOO सर्व जबाबदारी किंवा हमींचे अस्वीकरण करते, मग ती स्पष्ट, लादलेली, वैधानिक किंवा अन्यथा कुठलीही असेल ज्यात मर्यादेशिवाय सुरक्षा, स्थिरता, अचूकता, व्यापारीकरण, विशिष्ट उद्देशासाठी फिटनेसची जबाबदारी आणि हमीचा समावेश आहे व तसेच कायद्याद्वारे संमत अधिकतम मर्यादेपर्यंत मालकी व बौद्धिक संपत्तीचे गैर-उल्लंघनाचा समावेश आहे.

  ६.३ iQOO याद्वारे अस्वीकरण करतात आणि तुम्ही याद्वारे iQOO, त्यांचे सहयोगी व कर्मचारी, संचालक आणि iQOO चे अधिकारी व त्यांचे सहयोगींची कायद्याद्वारे संमत कमाल मर्यादेपर्यंत सेवा किंवा संबंधित कंटेंटमुळे तुम्हाला झालेल्या कसल्याही अप्रत्यक्ष, प्रासंगिक, विशेष किंवा इतर हानी किंवा नुकसानाच्या सर्व जबाबदारींमधून अपरिवर्तनीय स्वरूपात, कायमची आणि बिनशर्त सुटका करीत आहात.

  ६.४ iQOO ला सेवा प्रदान करण्यात अपयश आल्यास किंवा या करारामधील खालील दायित्वांची पूर्तता करण्यास जबाबदार धरण्यात येऊ नये:

    ६.४.१ मोठी घटना जसे की भूकंप, पूर, वादळ, सुनामी, महामारी, युद्ध, दहशतवादी हल्ला, दंगा, बंद आणि सरकारी आदेश परंतु यापुरतेच मर्यादित नाही;

    ६.४.२ आमच्याद्वारे किंवा आमच्यासाठी तृतीय-पक्षाद्वारे चलित सॉफ्टवेअरची दुरूस्ती, अपडेट किंवा हार्डवेअरचे अपग्रेड;

    ६.४.३ नेटवर्क ऑपरेटरच्या समस्येमुळे किंवा वापरकर्त्याच्या नेटवर्क कनेक्शन समस्येमुळे डेटा प्रसारणातील व्यत्यय;

    ६.४.४ तृतीय-पक्षाने पुरवलेल्या सॉफ्टवेअर किंवा सेवेमुळे किंवा तृतीय-पक्षाच्या कृतीमुळे आलेली कोणतीही समस्या;

    ६.४.५ इतर परिस्थिती ज्यामध्ये iQOO ला कायदे आणि नियमानुसार किंवा इतर अपरिहार्य कारणांमुळे जसे की iQOO च्या व्यावसायिक अॅडजस्टमेंटमुळे सेवा निलंबित किंवा बंद करणे आवश्यक असेल.

७ प्रशासकीय कायदे आणि न्यायक्षेत्र

  जोपर्यंत अन्यथा तुम्ही रहात असलेल्या ठिकाणाच्या कायद्यांमध्ये काही वेगळी तरतूद दिलेली नसेल, तर या कराराचे चीन प्रजासत्ताकाच्या कायद्यांनुसार प्रशासन आणि अर्थान्वयन केले जावे आणि मतभेदाची मानके लागू होणार नाहीत. तुमची संमती आहे की या करारामुळे किंवा त्यासंबंधी उद्भवणाऱ्या कुठल्याही वादाचे निराकरण वाटाघाटींद्वारे केले जाईल. वाटाघाटींद्वारे कोणत्याही वादाचे निराकरण करणे शक्य न झाल्यास तो पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाच्या कायद्यानुसार लवादासाठी शेंझेन कोर्ट ऑफ इंटरनॅशनल आर्बिट्रेशन (SCIA), पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना कडे सादर केला जाईल. आणि लवादाचे स्थान शेंझेन असेल.

८ संपर्क

  जर तुम्हाला कोणत्याही तक्रारी, प्रश्न, कमेंट किंवा सूचना करायच्या असतील तर तुम्ही [मदत आणि फीडबॅक] द्वारे तुमचे प्रश्न सादर करू शकता.

९ संकीर्ण

  ९.१ हा करार म्हणजे तुमच्या आणि iQOO दरम्यान संपूर्ण संमती स्थापित करतो जो या विषयासंदर्भात तुमच्या व iQOO दरम्यानच्या सर्व मागील करारांची जागा घेतो.

  ९.२ जर या कराराची एखादी तरतूद अवैध किंवा लागू करण्यायोग्य नसेल तर उर्वरित भाग पूर्णपणे प्रभावी असेल.

  ९.३ या कराराच्या एखाद्या तरतुदीची अंमलबजावणी झाली नाही तर त्याला तुम्ही किंवा iQOO ने हक्क सोडून दिले आहेत असे मानले जाणार नाही.

  ९.४ iQOO ने तुम्हाला दिलेले परवाने फक्त येथे अभिव्यक्त केल्यापुरतेच मर्यादित असतील. तुम्हाला अभिव्यक्त स्वरूपात न दिलेले सर्व अधिकार iQOO राखून ठेवत आहे.

  ९.५ जर तुम्ही या कराराचे उल्लंघन केले तर हा करार एकतर्फी रद्द करण्याचा आणि संबंधित सेवा बंद करण्याचा iQOO ला अधिकार असेल व त्यामुळे होणाऱ्या हानीसाठी कुठलीही जबाबदारी सुद्धा स्वीकारली जाणार नाही. शंका टाळण्यासाठी, या कराराची कुठलीही तरतुद जी या कराराच्या निलंबनानंतरही अभिव्यक्त किंवा चालू राहणे अपेक्षित असेल ती संमत अटींच्या समाप्तीपर्यंत किंवा तिच्या स्वरूपानुसार समाप्त होतपर्यंत टिकून राहील.

  ९.६ या करारामध्ये वेळोवेळी सुधारणा करण्याचा अधिकार iQOO राखून ठेवत आहे. तुम्ही संबंधित पृष्ठावर कराराच्या अटींची नवीनतम आवृत्ती तपासू शकता. तुम्ही सेवेचा सतत वापर सुरू ठेवणे म्हणजे या कराराच्या सुधारित आवृत्तीचा तुम्ही स्वीकार करीत आहे असे समजले जाईल.

  ९.७ तुम्ही सेवेचा वापर करतांना ज्या स्थानिक प्राधिकरण, राज्य, स्वायत्त प्रदेश, फेडरेशन आणि देशामध्ये राहता त्यांचे कायदे, अध्यादेश, अटी आणि इतर नियमांचे पालन करण्याचे मान्य करता.

कॉपीराइट © २०२२-वर्तमान vivo Mobile Communication Co., Ltd. सर्व हक्क आरक्षित

२६ ऑगस्ट, २०२२ रोजी अपडेट केले